Close Visit MahaNews12

खाजगी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! मासिक पेन्शन हवी असेल तर ‘या’ 2 अटी पूर्ण कराव्याच लागतील

मुंबई : Private Sector Employees :   खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ईपीएफ (EPF) कपात केली जाते. मात्र, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत मासिक पेन्शन मिळविण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन मिळविताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

ईपीएफओच्या (EPFO) नियमांनुसार, कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 10 वर्षांची पेन्शनयोग्य सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. ही सेवा सलग असणे बंधनकारक नसली तरी नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते नवीन नियोक्त्याकडे हस्तांतरित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलताना पीएफची रक्कम काढून घेतली, तर त्याची आधीची पेन्शनयोग्य सेवा तुटते. अशा परिस्थितीत पूर्वीची सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्सफर करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो.

याशिवाय, पूर्ण मासिक पेन्शन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याचे वय 58 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या दोन्ही अटी पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कर्मचारी ईपीएस अंतर्गत आजीवन मासिक पेन्शनसाठी पात्र ठरतो.

तज्ज्ञांच्या मते, नोकरी बदलताना पीएफ काढण्याऐवजी तो नवीन संस्थेकडे हस्तांतरित केल्यास भविष्यातील पेन्शनचा लाभ कायम राहतो. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ईपीएफ आणि ईपीएसचे नियम समजून घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा आधार मिळावा, यासाठी ईपीएसच्या अटींचे पालन करणे आणि पीएफ खाते सातत्याने सुरू ठेवणे ही प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाची बाब ठरत आहे.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!