Close Visit MahaNews12

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; २ टक्के महागाई भत्ता वाढीसह ७ महिन्यांची थकबाकी देण्याची मागणी. DA Allowance Update

मुंबई : DA Allowance Update : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढीव २ टक्के महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे.

संघटनेने याबाबत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. १ जानेवारी २०२६ पासून वाढीव महागाई भत्ता लागू करून जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, असे संघटनेने म्हटले आहे.

सप्टेंबरच्या पगारात मिळणार का वाढीव DA?

शासनाच्या निर्णयानुसार वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट २०२६ च्या वेतनापासून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही ऑगस्ट देय सप्टेंबर २०२६ च्या वेतनात ६० टक्के महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच जानेवारीपासून जुलैपर्यंतची सात महिन्यांची थकबाकीही एकत्र देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सध्या ५८ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर लाभ मिळावा, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. DA Allowance Update

त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबरच्या वेतनात २ टक्के वाढीव DA आणि सात महिन्यांची थकबाकी मिळणार का? याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय एसटी महामंडळाच्या कार्यवाहीवर अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!