Maharashtra SIR Update : राज्यात ‘स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन’ मोहिमेला सुरुवात
महाराष्ट्रात आता मतदार याद्यांच्या सखोल पडताळणीसाठी ‘स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत निवडणूक कर्मचारी आणि बीएलओ (Booth Level Officer) हे घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत. मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, या मोहिमेत संपूर्ण मतदार यादीची स्वच्छता आणि फेरतपासणी करण्यात येणार आहे.
बीएलओ घरोघरी येऊन विचारणार 4 महत्त्वाचे प्रश्न
या विशेष पडताळणी मोहिमेदरम्यान बीएलओ प्रत्येक मतदाराकडे जाऊन काही महत्त्वाची माहिती घेणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रश्नांचा समावेश असेल :
- सध्याच्या मतदार यादीतील तुमची माहिती योग्य आहे का?
- नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये बदल करायचा आहे का?
- संबंधित मतदार हा सध्या त्या पत्त्यावर राहतो का?
- मतदार ASDD (Absent, Shifted, Death, Duplicate) निकषात येतो का?
जर एखादा मतदार अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा डुप्लिकेट आढळला तर त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
1 लाखांहून अधिक बीएलओ करणार काम. Maharashtra SIR
या संपूर्ण मोहिमेसाठी राज्यभरात तब्बल 1 लाख 253 बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. कामाचा मोठा व्याप लक्षात घेता त्यांना सहाय्यक कर्मचारी देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
प्रत्येक मतदाराचा ‘रेम्युनरेशन फॉर्म’ छापून बीएलओ तो घेऊन नागरिकांच्या घरी जाणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक बदलांची नोंद केली जाईल.
2002 ते 2004 मधील मतदार याद्यांचे होणार मॅपिंग
या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 2002 ते 2004 या कालावधीतील मतदार याद्यांचे मॅपिंग. त्या काळात संबंधित मतदार कुठे राहत होता किंवा त्याची नोंद कुठे होती, याची माहिती घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने यासाठी देशभरातील जिल्हानिहाय जुन्या मतदार याद्या आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्यातील जुनी माहिती शोधणे शक्य होणार आहे. Maharashtra SIR
जनगणना पूर्ण झाल्यानंतरच सुरू होणार SIR
सध्या राज्यात जनगणनेचं काम सुरू असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती की, जनगणनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत SIR मोहीम सुरू करू नये.
निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली असून, जनगणनेचं घरोघरी माहिती संकलन पूर्ण झाल्यानंतरच SIR प्रक्रिया सुरू होणार आहे.
30 जून ते 29 जुलैदरम्यान घराघरात पडताळणी
निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार, 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ घराघरात जाऊन मतदार पडताळणी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या काळात आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. Maharashtra SIR