Close Visit MahaNews12

एस टी कामगार संघटनेची संयुक्त विचार विनिमय बैठक संपन्न ; विविध प्रश्नांवर आगार प्रमुखांसोबत सकारात्मक चर्चा. Msrtc Meeting Beed

एस टी कामगार संघटनेची संयुक्त विचार विनिमय बैठक संपन्न ; विविध प्रश्नांवर आगार प्रमुखांसोबत सकारात्मक चर्चा. Msrtc Meeting Beed 

प्रतिनिधी, पाटोदा 

बीड : Msrtc Meeting Beed  : पाटोदा आगारातील कामगारांच्या विविध अडचणी, तांत्रिक त्रुटी तसेच कामकाजाशी संबंधित प्रश्नांबाबत कामगार संघटनेची संयुक्त विचार विनिमय बैठक उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुख श्री डोके साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून कामगारांच्या समस्या मांडल्या.

बैठकीदरम्यान आगारातील तांत्रिक त्रुटी, कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, कामाच्या सुविधांचा अभाव तसेच प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.

यावेळी कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते श्रीकांत येडे साहेब , अध्यक्ष बांगर साहेब, सचिव चौधरी साहेब तसेच सहसचिव वारे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या हिताच्या विविध मुद्यांवर आगार प्रमुखांचे लक्ष वेधले.

बैठकीच्या शेवटी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन पाटोदा आगार प्रमुखांना देण्यात आले. कामगारांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी आगार प्रमुखांनी सकारात्मक विचार करून सर्व प्रश्न सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिले.

Leave a Comment

error: Content is protected !!