Maharashtra Government Employees News : आदिवासी विकास विभागाचा महत्वाचा निर्णय
Maharashtra Government Employees News : आदिवासी विकास विभागामार्फत 12 व 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतर मिळणाऱ्या दोन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (ACP) लागू करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासन निर्णयानुसार, मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्र.1861/2025 मध्ये न्यायालयाने दि.10 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित अपीलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे निर्देश दिले होते.
01 जानेवारी 2024 पासून योजना लागू
या न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाने राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.01 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार, शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
थकबाकी मिळणार नाही, शासनाची स्पष्टता. Maharashtra Government Employees News
शासन निर्णयामध्ये सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची थकबाकी अथवा मागील कालावधीतील आर्थिक लाभ देय राहणार नाहीत.
मात्र, दि.01 जानेवारी 2024 पासून नियमितपणे या योजनेअंतर्गत लाभ लागू राहणार असल्याने संबंधित शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवाविषयक लाभांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. Maharashtra Government Employees News