मे 2026 च्या वेतनाबाबत वित्त विभागाचे महत्वाचे परिपत्रक, कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. May Salary Update 

mahanews18

May Salary Update  : राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. वित्त विभागामार्फत दि.22 मे 2026 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून, नविन सेवार्थ प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने नविन सेवार्थ प्रणाली प्रभावीपणे लागू करण्यासाठी मध्यम व लघु आस्थापना असणाऱ्या सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना आवश्यक निर्देश दिले आहेत. या परिपत्रकानुसार पुणे विभागातील सर्व कोषागारांअंतर्गत येणाऱ्या मध्यम व लघु आस्थापनांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी आता केवळ नविन सेवार्थ प्रणालीमधूनच वेतन देयके प्रक्रिया करावीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जुन्या सेवार्थ प्रणालीमधून कामकाज बंद

वित्त विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, माहे मे 2026 देय जून 2026 पासून सर्व वेतन देयके केवळ नविन सेवार्थ प्रणालीमधूनच संस्करीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कोणतेही कामकाज करता येणार नाही. May Salary Update 

यामुळे आता सर्व विभागांनी नविन प्रणालीमध्ये आवश्यक माहिती, वेतन नोंदी तसेच इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. शासनाने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

वेतन उशिरास वित्त विभाग जबाबदार राहणार नाही. May Salary Update 

सदर परिपत्रकात वित्त विभागाने महत्वाचा इशाराही दिला आहे. जर संबंधित विभाग किंवा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी विहीत मुदतीत नविन सेवार्थ प्रणालीतील कामकाज पूर्ण केले नाही, तर माहे मे 2026 देय जून 2026 चे मासिक वेतन देयक तयार करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. May Salary Update 

अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा झाल्यास त्यास वित्त विभाग जबाबदार राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी तातडीने नविन सेवार्थ प्रणालीतील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. May Salary Update 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!