जेष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, कोणत्याही दवाखान्यात ज्येष्ठांना आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार. Senior Citizen Update 

mahanews18

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा

 Senior Citizen Update : केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत आता 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेद्वारे पात्र ज्येष्ठांना तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख 20 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणत्या उपचारांचा मिळणार लाभ?

या योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, अतिदक्षता विभागातील उपचार तसेच विविध महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचार टाळणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे.

याशिवाय जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच आयुष्मान योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे रुग्णांना कागदपत्रांची अतिरिक्त धावपळ करावी लागणार नाही. Senior Citizen Update

घरी बसून तयार करा ‘आयुष्मान वय वंदना’ कार्ड

सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया देखील सुलभ केली आहे. ‘आयुष्मान’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी अॅपमध्ये ‘70+’ हा पर्याय निवडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आधार पडताळणीनंतर वैयक्तिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करता येते आणि त्यानंतर कार्ड डाउनलोड करता येते.

तसेच नागरिकांना सीएससी सेंटर, आयुष्मान काऊंटर किंवा संबंधित योजना कार्यालयात जाऊनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपीच्या मदतीने लॉग-इन करून कार्ड मिळवता येणार आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेलाही उत्तम प्रतिसाद

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’लाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करता येतो. पुणे एसटी विभागातून जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत तब्बल 73 लाख 72 हजार 367 ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. Senior Citizen Update

या योजनेसाठी 585 रुपये भरून स्मार्ट कार्ड घ्यावे लागते. त्यानंतर वर्षभर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.

ज्येष्ठांसाठी आरोग्य आणि प्रवासात मोठी मदत

‘आयुष्मान वय वंदना’ आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ या दोन्ही योजनांमुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य उपचारांसाठी आर्थिक मदत आणि मोफत प्रवास सुविधा मिळाल्यामुळे ज्येष्ठांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. Senior Citizen Update

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!