मुंबई :NCMC Smart Card महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याची मुदत आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळालेले नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र लाभार्थी शासनाच्या सवलतींपासून वंचित राहू नयेत, यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रवाशांना मिळणार सवलतीचा लाभ
NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पुढील प्रवाशांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळणार आहे.
- अमृत ज्येष्ठ नागरिक – एसटीमधून मोफत प्रवास
- ज्येष्ठ नागरिक – प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत
- महिला प्रवासी – प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत
परिवहन मंत्र्यांचे काय म्हणणे?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी प्रवाशांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती या सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे कोणत्याही पात्र प्रवाशाला अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन.NCMC Smart Card
ज्या पात्र प्रवाशांनी अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त केलेले नाही, त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेत लवकरात लवकर कार्ड मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यामुळे भविष्यात शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय घेता येईल.