मुंबई : Government Employees Update : राज्य शासनाने विविध विभागांशी संबंधित तीन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. या निर्णयांचा परिणाम दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच मराठी भाषा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार आहे.
पहिला निर्णय : दिव्यांग संस्थेला सातव्या वेतन आयोगाचा निधी
दिव्यांग सक्षमीकरण विभागाने मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदान वितरणाबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंकुर कर्णबधीर निवासी विद्यालय, कुसुंबा (ता. धुळे) या संस्थेला सातव्या वेतन आयोगाच्या वेतनफरकासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
दुसरा निर्णय : सचिव पदाच्या ज्येष्ठता यादीस मंजुरी
मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ, मुंबई येथील सचिव (गट-अ, राजपत्रित) या एकाकी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. 1 जानेवारी 2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी शासनाने मंजूर केली आहे.
तिसरा निर्णय : तीन संवर्ग मृत संवर्ग घोषित.Government Employees Update
मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमधील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक हे संवर्ग ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित पदांच्या भविष्यातील पदरचना व भरती प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने एका दिवसात जारी केलेले हे तीन शासन निर्णय संबंधित विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांसाठी महत्त्वाचे मानले जात असून, त्याची अंमलबजावणी संबंधित विभागांकडून पुढील प्रक्रियेनुसार करण्यात येणार आहे.