Close Visit MahaNews12

पाटोदा आगारात कामगार संघटनेची धडक! कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मोठी चर्चा

पाटोदा आगारात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा; मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे पदाधिकारी  आगारात

पाटोदा : प्रतिनिधी, Msrtc News Update 
कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे पदाधिकारी नुकतेच पाटोदा आगारात दाखल झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुख डोके साहेब यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी, सेवा विषयक प्रश्न तसेच विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बैठकीनंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आगार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी विभागीय अध्यक्ष चातुर साहेब, विभागीय सचिव गणेश चव्हाण साहेब, वल्लभ चिरके साहेब, विभागीय सहसचिव श्रीकांत येडे पाटील, आगाराध्यक्ष चौधरी, आधार सचिव बाळासाहेब बांगर, सहसचिव बाळासाहेब डफळ, ज्येष्ठ नेते अजिनाथ वारे, रावसाहेब गायकवाड, एस टी कामगार आणि कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!