Close Visit MahaNews12

NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! PRAN खात्यातील गुंतवणुकीसाठी नवे विकल्प; वित्त विभागाचा महत्त्वाचा GR जारी.

NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! PRAN खात्यातील गुंतवणुकीसाठी नवे विकल्प; वित्त विभागाचा महत्त्वाचा GR जारी

मुंबई | प्रतिनिधी : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाने दि. 10 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, PRAN खात्यातील स्तर-01 (Tier-I) अंशदानाच्या गुंतवणुकीसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शासन निर्णयानुसार, निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्या परिपत्रकानुसार NPS मधील ऑटो चॉईस लाईफ सायकल फंड पर्यायांमध्ये बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत Conservative Life Cycle Fund चे नाव बदलून Life Cycle 25 – Low तर Moderate Life Cycle Fund चे नाव Life Cycle 50 – Moderate असे करण्यात आले आहे.

याशिवाय, ऑटो चॉईस लाईफ सायकल फंड अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त गुंतवणूक विकल्प उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीचे नियोजन अधिक लवचिकपणे करता येणार आहे.

या निर्णयानुसार, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 30 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयातील विद्यमान विकल्पांसोबतच PFRDA ने उपलब्ध करून दिलेले नवीन विकल्पही निवडता येणार आहेत.

या निर्णयामुळे NPS अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या PRAN खात्यातील Tier-I अंशदानासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, निवृत्ती नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!