Close Visit MahaNews12

माहे ऑगस्ट देय इन सप्टेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार.

मुंबई : September Salary Update : शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने दि. 31 जुलै 2026 रोजी परिपत्रक काढून माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 चे वेतन आहरित करण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

यापूर्वी वित्त विभागाच्या दि. 27 मार्च 2026 च्या परिपत्रकानुसार सेवार्थ प्रणालीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, दि. 28 जुलै 2026 रोजी वित्त विभाग, मंत्रालय मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने नव्याने परिपत्रक जारी करत अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 चे वेतन देयक तयार होण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचे ऑगस्ट 2026 चे वेतन आहरित करण्यात येणार नाही. तसेच यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सर्व संबंधितांनी या सूचनांची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपले सप्टेंबर 2026 चे वेतन वेळेत मिळेल याची खात्री करून घ्यावी. September Salary Update :

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!