कामगारांसाठी मोठा दिलासा!
कामाच्या ठिकाणी जेवणाच्या सुट्टीत अपघात झाला तरी मिळणार नुकसानभरपाई; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली : Employee Compensation Act : कामाच्या ठिकाणी जेवणाच्या सुट्टीदरम्यान झालेला अपघातही नोकरीदरम्यान झालेला अपघात मानला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला Employee’s Compensation Act अंतर्गत नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, जेवणासाठी घेतलेला तात्पुरता ब्रेक हा रोजगार आणि अपघात यांच्यातील संबंध तोडत नाही. तसेच केवळ ‘सुपरवायझर’ असे पदनाम असल्याने कर्मचारी कायद्याच्या कक्षेबाहेर जात नाही. प्रत्यक्षात तो कोणत्या प्रकारचे काम करत होता, यालाच अधिक महत्त्व आहे. Employee Compensation Act
या प्रकरणात बांधकामस्थळी मोबाईल क्रेनमधून लोखंडी रॉड पडून कर्मचाऱ्याचा डावा पाय गमवावा लागला होता. त्याला देण्यात आलेली ₹7.86 लाखांची नुकसानभरपाई कायम ठेवत न्यायालयाने विमा कंपनीचे अपील फेटाळले.