Close Visit MahaNews12

सोनं अजुन महागलं, आठवडाभरात मोठी उसळी

Gold-Silver Price : डॉलर इंडेक्सवरील दबाव आणि जागतिक स्तरावर महागाई कमी होण्याची शक्यता यामुळे या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंना जोरदार मागणी मिळाल्याने सोन्याच्या दरात तब्बल ₹6,471, तर चांदीच्या दरात ₹17,317 ची वाढ नोंदवली गेली आहे.

‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹1,46,344 वर पोहोचला असून, गेल्या आठवड्यात तो ₹1,39,873 होता. म्हणजेच एका आठवड्यात सोन्याने मोठी झेप घेतली आहे.

याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,34,051, तर 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,09,758 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व कॅरेटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

या आठवड्यात 1 जुलै रोजी सकाळच्या सत्रात सोन्याने ₹1,39,434 हा नीचांकी स्तर गाठला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या जोरदार खरेदीमुळे 3 जुलैच्या संध्याकाळी सोन्याने ₹1,46,344 या आठवड्यातील सर्वोच्च स्तराला स्पर्श केला.

चांदीनेही मोडला विक्रम

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. एका आठवड्यात ₹17,317 ची वाढ होत चांदीचा दर ₹2,33,858 प्रति किलो या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हा दर ₹2,16,541 प्रति किलो होता.

1 जुलै रोजी चांदीचा दर ₹2,21,355 इतका होता. त्यानंतर सतत वाढ होत 3 जुलैच्या संध्याकाळी चांदीने ₹2,33,858 चा विक्रमी स्तर गाठला.

का वाढले सोने-चांदीचे दर?

बाजार तज्ज्ञांच्या मते, या तेजीमागे दोन प्रमुख कारणे आहेत.

  • डॉलर इंडेक्समध्ये झालेली कमजोरी, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला.
  • जागतिक स्तरावर महागाई कमी होण्याची शक्यता आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची मागणी वाढली.

यामुळे येत्या काही दिवसांतही सोने-चांदीच्या दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

add_filter('the_content', function ($content) { if (!is_single()) return $content; $social = '
📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!