Close Visit MahaNews12

पाटोदा आगार प्रमुखपदी श्री संतोष डोके यांची निवड; कामगार संघटनेकडून सत्कार

पाटोदा आगार प्रमुखपदी श्री संतोष डोके यांची निवड; कामगार संघटनेकडून सत्कार

पाटोदा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पाटोदा आगार प्रमुखपदी श्री संतोष डोके यांची निवड झाल्याबद्दल एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे विभागीय सचिव श्रीकांत येडे पाटील, पाटोदा आगार अध्यक्ष विष्णू बांगर, आगार सचिव गोरक्षनाथ चौधरी, उपाध्यक्ष बाळू डफळ यांच्यासह आगाराचे सहायक कार्यशाळा अधीक्षक संतोष शिंदे उपस्थित होते. तसेच मंचक आरसूळ, आप्पा मिसाळ, दहिफळे, वारे, गणेश चवरे, त्रिंबक शिंदे, रंजित राऊत, ज्ञानेश्वर भोसले, मडावी, कराड, शेख, काशीद मामा, सूर्यवंशी तात्या, नागरगोजे आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

नवनियुक्त आगार प्रमुख श्री डोके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत पाटोदा आगाराच्या प्रगतीसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. आगारातील कामकाज अधिक सक्षम आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Comment

error: Content is protected !!