Close Visit MahaNews12

पाटोदा आगाराचे प्रमुख कारागीर श्रीकांत येडे पाटील यांची विभागीय उपसचिवपदी तर राज्य कार्यकारिणी सदस्य पदी आजिनाथ वारे यांची निवड. Msrtc News Update Today

पाटोदा, प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाटोदा आगारातील प्रमुख कारागीर तथा कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे श्री. श्रीकांत येडे पाटील यांची मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या विभागीय उपसचिव पदावर निवड करण्यात आली असुन पाटोदा आगारातील आजिनाथ वारे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे तसेच महेश लोंढे यांची विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

श्रीकांत येडे पाटील आणि आजिनाथ वारे यांनी अनेक वर्षांपासून कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी, विविध प्रशासकीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच कर्मचारी कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैलीमुळे आणि संघटनात्मक नेतृत्वामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे कामगार बांधवांनी सांगितले.

निवडीची घोषणा होताच पाटोदा आगारातील यांत्रिकी विभागातील कर्मचारी तसेच चालक, वाहक व सहकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी दोघांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

कामगारांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे ही ओळख राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीबद्दल विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!