या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश, अन्यथा वेतन रोखणार. Teacher Salary News 2026
Teacher Salary News 2026 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. दि. 13 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार निवडणूक तसेच इतर शासकीय कामांसाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची माहिती मागवली. Teacher Salary News 2026
परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, सर्व क्षेत्रीय कार्यालयांना स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांतील निवडणूक किंवा इतर शासकीय कामांवर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या शिक्षकांची माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित शिक्षक किती कालावधीपासून प्रतिनियुक्तीवर आहेत याचाही तपशील सादर करावा लागणार आहे.
मूळ आस्थापनेवर रुजू न झाल्यास वेतन होणार बंद
शासनाने सर्व संबंधित शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळा किंवा संस्थेमध्ये रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, माहितीमध्ये नमूद नसलेल्या पण इतर शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांचीही माहिती घेऊन संबंधित कार्यालय प्रमुखांमार्फत त्यांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्यास सांगितले आहे. Teacher Salary News 2026
महत्त्वाचे म्हणजे, कार्यमुक्तीचे आदेश दिल्यानंतरही एखादा शिक्षक आपल्या मूळ आस्थापनेवर रुजू झाला नाही, तर त्या शिक्षकाचे माहे मे 2026 चे वेतन, जे जून 2026 मध्ये अदा केले जाणार आहे, ते रोखण्यात येऊ शकते, असा स्पष्ट इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या हजारो शिक्षकांनी तातडीने आपल्या मूळ आस्थापनेवर रुजू होणे आवश्यक ठरणार असून, अन्यथा त्यांच्या वेतनावर परिणाम होऊ शकतो.