कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले पीएफ व्याजाचे पैसे ? जाणुन घ्या PF Interest 2026
PF Interest Rate : देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सध्या पीएफवरील व्याजाची प्रतिक्षा आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी ईपीएफओने (EPFO) 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. अनेकदा खात्यात व्याज जमा होते, मात्र कर्मचाऱ्यांना त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे घरबसल्या पीएफ खात्यातील शिल्लक आणि व्याजाची रक्कम कशी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
देशातील लाखो कर्मचारी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (PF) मिळणाऱ्या व्याजाची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफवरील व्याजदरात कोणताही बदल न करता 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) हा निर्णय घेतला होता.
यामुळे पीएफ खातेदारांना त्यांच्या जमा रकमेवर चांगला परतावा मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारकडून व्याजाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ती तुम्ही काही मिनिटांत मोबाईलवर तपासू शकता.
व्याजदर कायम, कर्मचाऱ्यांना मिळणार 8.25 टक्के परतावा
ईपीएफओकडून दरवर्षी पीएफवरील व्याजदर निश्चित केला जातो. यंदाही व्याजदर 8.25 टक्के इतकाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात चांगली व्याजरक्कम जमा होणार आहे.
अनेक कर्मचारी केवळ पगारातून पीएफ कपात होते एवढेच जाणतात. मात्र खात्यात किती रक्कम जमा आहे, किती व्याज मिळाले, किती पैसे काढता येतात किंवा खाते अपडेट कसे तपासायचे याबाबत माहिती नसते. आता हे सर्व तुम्ही घरबसल्या सहज तपासू शकता.
या 4 पद्धतीने तपासा PF खात्यातील शिल्लक आणि व्याज.PF Interest 2026
1) UMANG App द्वारे तपासा PF बॅलन्स
- सर्वप्रथम मोबाईलमध्ये UMANG App डाउनलोड करा
- त्यानंतर मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून लॉगिन करा
- मेनूमध्ये जाऊन EPFO पर्याय निवडा
- View Passbook वर क्लिक करा
- UAN नंबर टाकून OTP व्हेरिफिकेशन करा
- त्यानंतर तुमच्या खात्यातील शिल्लक आणि व्याजाची माहिती दिसेल
2) मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या PF शिल्लक
जर तुम्हाला इंटरनेटशिवाय पीएफ बॅलन्स तपासायचा असेल तर मिस्ड कॉलची सुविधा उपयोगी ठरते.
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून – वर मिस्ड कॉल द्या
- काही क्षणातच एसएमएसद्वारे PF खात्याची माहिती मिळेल
3) SMS द्वारे तपासा PF खाते
ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुम्ही एसएमएस पाठवूनही माहिती मिळवू शकता.
- अधिकृत नंबरवर संदेश पाठवा
- इंग्रजीसाठी : EPFOHO UAN ENG
- मराठीसाठी : EPFOHO UAN MAR
- हिंदीसाठी : EPFOHO UAN HIN
यानंतर काही सेकंदातच खात्यातील शिल्लक आणि व्याजाची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.
4) EPFO Portal वरून तपासा खाते
- EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जा
- UAN आणि पासवर्डने लॉगिन करा
- Passbook विभागात जाऊन जमा रक्कम आणि व्याज तपासा
घरबसल्या मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती
पीएफ खात्यातील शिल्लक, व्याज आणि व्यवहार तपासण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने काही मिनिटांत ही माहिती मिळू शकते. त्यामुळे वेळोवेळी PF खाते तपासत राहणे आवश्यक आहे.