सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!  या नियमांत राज्य सरकारची सुधारणा. Employees New Rules 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!  या नियमांत राज्य सरकारची सुधारणा. Employees New Rules 

विवाह, कौटुंबिक व वैयक्तिक कारणांमुळे होणार दिलासा

Employees New Rules :  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. सेवाकाळात घोषित केलेले ‘स्वग्राम’ अर्थात होमटाउन बदलण्यासाठी राज्य सरकारने आता अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिली आहे. विवाह, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आपत्कालीन कारणांमुळे स्थलांतर करावे लागलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.

सध्याच्या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांच्या आत स्वग्राम घोषित करणे बंधनकारक होते. तसेच सेवाकाळात केवळ एकदाच स्वग्राम बदलण्याची परवानगी दिली जात होती. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीनंतर स्वग्राम घोषित केल्यामुळे त्यांना पुढे बदलाची संधी मिळत नव्हती. त्यामुळे ‘स्वग्राम रजा प्रवास सवलत’ (LTC) मिळवताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या.

महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, विहित मुदतीनंतर स्वग्राम घोषित केलेल्या अविवाहित किंवा विवाहित महिला कर्मचाऱ्यांना विशेष परिस्थितीत स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली आहे. विवाह, घटस्फोट, वैधव्य, परित्यक्ता किंवा पुनर्विवाह अशा कारणांमुळे होणाऱ्या स्थलांतराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, शासन निर्णय जारी झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत स्वग्राम बदलासाठी अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. यामुळे विवाहानंतर दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. Employees New Rules 

कौटुंबिक स्थलांतर व नैसर्गिक आपत्तींनाही लागू. Employees New Rules

फक्त महिला कर्मचाऱ्यांपुरताच हा निर्णय मर्यादित नसून, कौटुंबिक कारणे, मुलांचे शिक्षण, शासकीय योजना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अन्य ठिकाणी स्थायिक झालेल्या कर्मचाऱ्यांनाही या अतिरिक्त संधीचा लाभ घेता येणार आहे.

यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी अर्जामध्ये आवश्यक माहिती व कारणे नमूद करणे बंधनकारक राहील. तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सेवापुस्तकात या बदलाची नोंद करण्यात येणार आहे. Employees New Rules

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!