Close Visit MahaNews12

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! 6 दिवस सलग बँक बंद राहणार, कामे आधीच पूर्ण करा. SBI Bank Holiday 2026

mahanews18

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! 6 दिवस सलग बँक बंद राहणार, कामे आधीच पूर्ण करा. SBI Bank Holiday 2026

SBI Bank Holiday 2026 : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या (SBI) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवसांत SBI च्या शाखा सलग 6 दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

23 मे 2026 पासून 28 मे 2026 पर्यंत विविध कारणांमुळे बँक शाखांमध्ये कामकाज ठप्प राहू शकते. त्यामुळे चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट, पासबुक अपडेट, कर्जासंबंधी कागदपत्रे आणि इतर शाखा-आधारित सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

कोणत्या दिवशी आणि का बंद राहणार बँका?

बँक बंद राहण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

  • 23 मे 2026 – महिन्याचा चौथा शनिवार
  • 24 मे 2026 – रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 25 आणि 26 मे 2026 – SBI कर्मचारी संघटनांचा देशव्यापी संप
  • 27 आणि 28 मे 2026 – बकरीद (ईद-उल-अजहा) निमित्त अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी

या सलग सुट्ट्यांमुळे शाखांमध्ये ग्राहकांची कामे पूर्णपणे थांबू शकतात.

SBI कर्मचारी संपावर का जाणार?

ऑल इंडिया स्टेट बँक स्टाफ फेडरेशनने बँक व्यवस्थापनाविरोधात दोन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. कर्मचारी संघटनांचा आरोप आहे की, कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित अनेक निर्णय व्यवस्थापनाकडून एकतर्फी घेतले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. SBI Bank Holiday 2026

कर्मचाऱ्यांच्या 16 प्रमुख मागण्या

कर्मचारी संघटनांनी बँक व्यवस्थापनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू करणे, सपोर्ट स्टाफ आणि मेसेंजर पदे भरती करणे, वेतनातील तफावत दूर करणे आणि बँकांमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे यांचा समावेश आहे. SBI YONO App

अलीकडेच काही शाखांमध्ये घडलेल्या सुरक्षेच्या घटनांचा दाखला देत सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच NPS अंतर्गत फंड मॅनेजर निवडीचे स्वातंत्र्य देण्याची मागणी कर्मचारी करत आहेत. 

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी? SBI Bank Holiday 2026

या काळात शाखा बंद असल्या तरी ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत. ग्राहक , नेट बँकिंग आणि ATM च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर, बिल पेमेंट आणि इतर व्यवहार करू शकतात.

तथापि, चेक जमा करणे, ड्राफ्ट काढणे, कर्जाशी संबंधित कागदपत्रे किंवा शाखेत प्रत्यक्ष जाऊन करावी लागणारी कामे आधीच पूर्ण करून घेणे अधिक सुरक्षित ठरेल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!