Close Visit MahaNews12

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 4 महत्वाचे शासन निर्णय जारी; निलंबित कर्मचाऱ्यांपासून सेवा पुनर्विलोकनापर्यंत मोठे निर्णय. Maharashtra Government Resolution

25 मे 2026 रोजी विविध विभागांचे महत्वाचे शासन निर्णय निर्गमित

मुंबई : Maharashtra Government Resolution : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 25 मे 2026 रोजी विविध विभागांकडून 4 महत्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्स्थापित करणे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे सेवा पुनर्विलोकन, संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा अनुपस्थिती कालावधी नियमित करणे तसेच राज्यकर अधिकारी पदनिर्मितीचा समावेश आहे.

गृह विभागाचा महत्वाचा निर्णय

गृह विभागामार्फत निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आरोग्य विभागात सेवा पुनर्विलोकनाला मंजुरी

सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-20) मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षांनंतर सेवा पुनर्विलोकन करण्यास मंजुरी दिली आहे. प्रशासनिक कार्यक्षमता आणि सेवेमधील गुणवत्ता तपासण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

संपात सहभागी कर्मचाऱ्यांना दिलासा. Maharashtra Government Resolution

सामान्य प्रशासन विभागाने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघ यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरील प्रशासकीय अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

वित्त विभागाकडून नवीन पदनिर्मिती

वित्त विभागाने वस्तू व सेवाकर (GST) विभागाच्या आस्थापनेवर राज्यकर अधिकारी गट-ब राजपत्रित संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. विभागातील प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. Maharashtra Government Resolution

Leave a Comment

error: Content is protected !!