जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Government Employee Transfer : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. देशात सुरू असलेल्या जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार आहे. Maharashtra Government Employee Transfer
अध्यादेश काढण्यासही मंजुरी
राज्य सरकारने मुदतवाढीबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने जाहीर करण्यासही मंजुरी दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित सुधारणा मसुद्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे.
जनगणना कामामुळे बदल्यांवर परिणाम
केंद्र सरकारकडून जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासनातील कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला अतिरिक्त वेळ मिळणार आहे. Maharashtra Government Employee Transfer