Close Visit MahaNews12

पेन्शनधारकांची मोठी मागणी; किमान पेन्शन ₹45 हजार करण्याची मागणी

नवी दिल्ली :  Pensioners Minimum Pension : आठव्या वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठ्या अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांच्या संघटनेने वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे. यामध्ये किमान पेन्शन ₹45 हजार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी. Pensioners Minimum Pension :

पेन्शनधारकांनी आठव्या वेतन आयोगासाठी 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होऊ शकते.

सध्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान बेसिक वेतन ₹18,000 आहे. 3.83 फिटमेंट फॅक्टरनुसार किमान बेसिक पगार सुमारे ₹69 हजार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

किमान पेन्शन ₹45 हजार हवी.

पेन्शनधारकांसाठी किमान बेसिक पेन्शन ₹45,000 करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या शेवटच्या पगाराच्या 67 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची मागणी आहे.

कुटुंब पेन्शनमध्येही वाढ करण्याची मागणी करण्यात आली असून, शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम कुटुंब पेन्शन म्हणून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महागाई भत्त्याबाबतही मागणी. Pensioners Minimum Pension

पेन्शनधारकांनी DA आणि DR मध्ये दर तीन महिन्यांनी बदल करण्याची मागणी केली आहे. महागाई वाढत असल्याने त्यानुसार पेन्शनमध्येही वेळोवेळी बदल व्हावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

वैद्यकीय सुविधांमध्ये वाढीची मागणी

पेन्शनधारकांसाठी वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कॅशलेस उपचार सुविधा आणि फिक्स्ड मेडिकल अलाउन्स ₹5,000 करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अंतिम निर्णय अद्याप नाही. 

दरम्यान, ₹45 हजार किमान पेन्शन आणि 3.83 फिटमेंट फॅक्टर या सध्या मागण्या आहेत. केंद्र सरकारने या मागण्या मंजूर केलेल्या नाहीत. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यानंतर केंद्र सरकार घेणारा निर्णय यावर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन किती वाढणार हे स्पष्ट होईल.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!