राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 4 मोठे शासन निर्णय; शिक्षण, महसूल, महिला व बालविकाससह GAD चे महत्त्वाचे आदेश
मुंबई : State Government Employees राज्य शासनाने दि. 31 जुलै 2026 रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित 4 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. या निर्णयांमध्ये शिक्षक-कर्मचारी अपील प्रक्रिया, कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, 50/55 वर्षांनंतरच्या सेवापात्रतेची तपासणी आणि UPS अंशदानासाठी नवीन ड्रॉईंग अकाउंट उघडण्यास मंजुरी अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
मुख्य निर्णय:
👉 शालेय शिक्षण विभाग: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अपीलसाठी राज्यस्तरीय तक्रार समिती स्थापन करण्यास मंजुरी.
👉 महसूल व वन विभाग: कर्तव्य बजावताना प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मंजूर.
👉 महिला व बाल विकास विभाग: शासकीय सेवकांच्या 50/55 वर्षांनंतर सेवेत राहण्याच्या पात्रतेबाबत महत्त्वाचा निर्णय. State Government Employees
👉 सामान्य प्रशासन विभाग: UPS अंशदान जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे नवीन Drawing Account उघडण्यास मंजुरी.
या चारही शासन निर्णयांमुळे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार असून संबंधित विभागांनी त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू केली आहे.