Close Visit MahaNews12

घर किंवा जमीन खरेदी करताय? रजिस्ट्री करण्याआधी ही 5 कागदपत्रे नक्की तपासा

घर किंवा जमीन खरेदी करताय? रजिस्ट्री करण्याआधी ही 5 कागदपत्रे नक्की तपासा

मुंबई : Property Registration : स्वतःचे घर किंवा जमीन खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी लोक आयुष्यभराची कमाई खर्च करतात. मात्र, प्रॉपर्टी खरेदी करताना केवळ रजिस्ट्री झाली म्हणजे सर्व काही सुरक्षित झाले, असे समजू नका. काही महत्त्वाची कागदपत्रे तपासली नाहीत तर भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

1. टायटल डीड आणि चेन डीड. Property Registration

सर्वात आधी विक्रेता त्या मालमत्तेचा खरा मालक आहे की नाही, हे तपासा. Title Deed आणि Chain Deed यामुळे मालमत्तेची मालकी यापूर्वी कोणाकडे होती आणि ती कशी हस्तांतरित झाली, याची माहिती मिळते. ही कागदपत्रे नसतील तर मालमत्तेच्या व्यवहारात धोका निर्माण होऊ शकतो.

2. मालमत्तेवर कर्ज किंवा कोर्ट केस आहे का? Property Registration

तुम्ही खरेदी करत असलेल्या घरावर किंवा जमिनीवर कोणते कर्ज, दावा किंवा न्यायालयीन प्रकरण आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. यासाठी Encumbrance Certificate (EC) महत्त्वाचे ठरते.

3. मंजूर नकाशा आणि लेआउट तपासा

घर किंवा इमारत ज्या नकाशानुसार बांधली आहे, तो संबंधित महानगरपालिका किंवा प्राधिकरणाने मंजूर केला आहे का, हे तपासा. मंजूर नकाशापेक्षा वेगळे किंवा अनधिकृत बांधकाम असल्यास भविष्यात गंभीर अडचण येऊ शकते.

4. Occupancy Certificate म्हणजेच OC

फ्लॅट किंवा इमारत खरेदी करताना Occupancy Certificate (OC) आहे का, हे नक्की पाहा. इमारत मंजूर नियम आणि आराखड्यानुसार बांधली असल्याचे हे महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. OC नसल्यास वीज-पाणी कनेक्शन आणि राहण्यासंबंधी अडचणी येऊ शकतात.

5. प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे का? Property Legal Documents

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी मागील Property Tax पावत्या तपासा. मागील मालकाने कर भरला आहे की काही थकबाकी बाकी आहे, याची माहिती यातून मिळते. थकबाकी असल्यास व्यवहार करण्यापूर्वी ती कोण भरणार, हे स्पष्ट करून घ्या.

महत्त्वाचे म्हणजे, बिल्डर किंवा एजंटच्या दबावाखाली येऊन घाईघाईने प्रॉपर्टी खरेदी करू नका. रजिस्ट्री करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करा. मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घेतल्यास भविष्यातील वाद टाळण्यास मदत होऊ शकते. Property Legal Documents

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!