Close Visit MahaNews12

वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणात मोठा बदल; ‘या’ कर्मचाऱ्यांचाही समावेश, शासनाचा नवा GR जारी.

मुंबई, दि. 6 ऑगस्ट :  Transfer Policy Update :  ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे. याबाबत दि. 04 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण हे ग्रामविकास विभागाच्या दि. 15 मे 2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू आहे. आता या विद्यमान धोरणामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली असून काही अतिरिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे.

कोणता बदल करण्यात आला?

शासन निर्णयातील प्रकरण 3 – तालुका अंतर्गत बदल्या मधील अनुक्रमांक 1 येथे यापूर्वी प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांचा उल्लेख करण्यात आला होता.

आता या यादीमध्ये “सहायक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदांचाही अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?Transfer Policy Update.

या सुधारणेमुळे संबंधित संवर्गातील सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्या तालुका अंतर्गत बदली प्रक्रिया आता विद्यमान बदली धोरणानुसार अधिक स्पष्ट आणि सुसंगत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेमधील संभ्रम कमी होऊन प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होईल.

ग्रामविकास विभागाचा हा सुधारित शासन निर्णय जिल्हा परिषदांमधील बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक व एकसमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सुधारित तरतुदींची नोंद घेऊन पुढील बदली प्रक्रियेसाठी शासन निर्णयाचा संदर्भ घ्यावा.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!