Close Visit MahaNews12

राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देण्याचे निर्देश

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देण्याचे निर्देश

नाशिक | प्रतिनिधी : आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी दि. 21 जून 2018 रोजी जारी केलेल्या महत्त्वपूर्ण परिपत्रकानुसार शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा (Earned Leave) रोखीकरणाचा लाभ देण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

परिपत्रकात नमूद केल्यानुसार, सर्व अपर आयुक्त तसेच प्रकल्प अधिकारी यांनी पात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, दि. 27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन पत्राचा संदर्भ देत, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर संचित अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांमध्ये ही महत्त्वाची भर ठरणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या लाभाचा फायदा घ्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!