Close Visit MahaNews12

पेंशनधारकांच्या खात्यातून आता बँका मनमानीने पैसे कापू शकणार नाहीत, RBI चा मोठा निर्णय.

mahanews18

मुंबई : RBI Pension Rules : निवृत्तीनंतर अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या मासिक पेन्शनवर अवलंबून असतात. औषधोपचार, घरखर्च आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पेन्शन हा त्यांचा महत्त्वाचा आधार असतो. अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतला आहे.

RBI च्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सरकारी पेन्शनधारकांच्या खात्यात चुकून जास्त रक्कम जमा झाल्यास बँकांना ती रक्कम कोणतीही पूर्वसूचना न देता थेट वसूल करता येणार नाही. कोणतीही कपात करण्यापूर्वी संबंधित पेन्शनधारकाला आगाऊ नोटीस देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कपातीपूर्वी संपूर्ण माहिती देणे आवश्यक

नव्या नियमानुसार केवळ नोटीस देणे पुरेसे ठरणार नाही. बँकेला अतिरिक्त रक्कम कोणत्या कालावधीत आणि कोणत्या कारणामुळे जमा झाली याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. तसेच संबंधित गणना (कॅल्क्युलेशन) आणि वसुलीची प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे, याचाही तपशील पेन्शनधारकाला कळवावा लागेल.

ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

अनेक वेळा पेन्शनधारकांच्या खात्यातून अचानक मोठी रक्कम वजा केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे आर्थिक नियोजन बिघडत होते. RBI च्या या निर्णयामुळे बँकांची मनमानी रोखली जाणार असून पेन्शनधारकांना पारदर्शक माहिती मिळणार आहे. तसेच ते बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार रकमेची पडताळणीही करू शकणार आहेत.

RBI च्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!