पाटोदा आगार प्रमुखपदी डोके साहेब रुजू; कामगार संघटनांकडून सत्कार

mahanews18

पाटोदा आगारात डोके साहेबांची आगार प्रमुखपदी रुजूवात; कामगार संघटनांकडून सत्कार

पाटोदा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाटोदा आगारात आगार प्रमुखपदी श्री. डोके साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानिमित्त विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कामगार संघटनेचे विभागीय सहसचिव श्री श्रीकांत येडे पाटील यांच्या सूचनेनुसार सत्कार कार्यक्रमात मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे आगार सहसचिव श्री. गायकवाड यांनी डोके साहेबांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वाहन परीक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते श्री. अमृत काळे, कारागीर क. शिंदे साहेब तसेच  संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डोके साहेबांच्या अनुभवाचा लाभ आगाराच्या विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आगारातील कर्मचारी, प्रवासी सेवा आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून आगाराच्या प्रगतीसाठी कार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

डोके साहेब यांनी सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानत आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!