नवीन कामगार कायदे 2026: पगारात मोठा बदल! इन-हँड सॅलरी कमी होणार का? घ्या जाणुन.  New Labour Codes

नवीन कामगार कायदे 2026: पगारात मोठा बदल! इन-हँड सॅलरी कमी होणार का? घ्या जाणुन.  New Labour Codes

केंद्र सरकारकडून देशात नवीन कामगार कायदे (New Labour Codes) लागू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, या नियमांमुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे विशेषतः Salary Structure, PF (भविष्य निर्वाह निधी) आणि हातात येणाऱ्या पगारावर (Take-Home Salary) थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाबाबत उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. New Labour Codes

नवीन कामगार कायद्यानुसार ‘वेजेस’ (Wages) ची व्याख्या बदलण्यात आली आहे. या नियमांनुसार कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic Salary) हा त्याच्या एकूण पगाराच्या (Gross Salary) किमान 50 टक्के असणे बंधनकारक राहणार आहे. सध्या अनेक कंपन्या बेसिक सॅलरी कमी ठेवून भत्ते (Allowances) जास्त देतात, मात्र नवीन नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना बेसिक सॅलरी वाढवावी लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराची संपूर्ण रचना बदलणार आहे.

बेसिक सॅलरी वाढल्याचा सर्वात मोठा परिणाम PF आणि ग्रॅच्युइटीवर होणार आहे. कारण PF चे योगदान हे बेसिक सॅलरीवर आधारित असते. त्यामुळे बेसिक सॅलरी वाढल्यास PF साठी कापली जाणारी रक्कमही वाढेल. याचा थेट परिणाम असा होईल की, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, याचा सकारात्मक पैलू म्हणजे दीर्घकालीन बचत वाढेल आणि निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळेल. New Labour Codes

तथापि, सर्व कर्मचाऱ्यांवर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी आधीच त्यांच्या एकूण पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्यांच्या Take-Home Salary मध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. तसेच ज्यांची Salary Structure आधीपासूनच या नियमांशी सुसंगत आहे, त्यांनाही फारसा फरक जाणवणार नाही.

या नवीन नियमांचा परिणाम कंपन्यांवरही होणार आहे. बेसिक सॅलरी वाढल्यामुळे कंपन्यांना त्यांच्या वाट्याचे PF योगदान आणि ग्रॅच्युइटीसाठी अधिक निधी राखावा लागणार आहे. यामुळे कंपन्यांचा एकूण खर्च वाढणार असून, त्यांना त्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल करावे लागतील. काही कंपन्या खर्च नियंत्रित करण्यासाठी नवीन भरती किंवा वेतन धोरणात बदल करू शकतात. New Labour Codes

एकूणच पाहता, नवीन कामगार कायद्यामुळे काही प्रमाणात हातात येणारा पगार कमी झाला तरी, दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी हे बदल फायदेशीर ठरणार आहेत. केंद्र सरकार सध्या या नियमांच्या अंमलबजावणीसाठी राज्यांशी चर्चा करत असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!