आठवड्यात ३ दिवस शाळा, २ दिवस ऑनलाईन? वाढत्या इंधन दरामुळे नवा प्रस्ताव चर्चेत. Maharashtra Education News

आठवड्यात ३ दिवस शाळा, २ दिवस ऑनलाईन? वाढत्या इंधन दरामुळे नवा प्रस्ताव चर्चेत. Maharashtra Education News

वाढत्या डिझेल दरांचा फटका आता थेट विद्यार्थ्यांच्या वाहतूक खर्चावर

Maharashtra Education News : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम आता थेट शाळा, बस चालक-मालक आणि पालकांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाढते डिझेल दर, वाहन देखभाल, विमा, फिटनेस आणि कर्मचारी वेतनाचा वाढता खर्च पाहता आगामी शैक्षणिक वर्षात शाळेच्या बसचे शुल्क वाढू शकते, अशी माहिती स्कूल व कंपनी बस ओनर्स असोसिएशनने (SBOA) दिली आहे.

यावर पर्याय म्हणून संघटनेने आठवड्यातून ‘३ दिवस प्रत्यक्ष शाळा आणि २ दिवस ऑनलाईन शिक्षण’ अशी ‘हायब्रिड स्कूलिंग’ पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. या प्रस्तावामुळे बस फेऱ्या कमी होतील आणि पालकांवरील अतिरिक्त आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. Maharashtra Education News

होर्मुझ खाडीतील संघर्षाचा परिणाम भारतातील शाळांवर

पश्चिम आशियातील होर्मुझच्या खाडीत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर वाढले असून त्याचा परिणाम भारतातील डिझेलच्या किंमतींवरही होत आहे. यामुळे शाळा बस सेवा चालविणाऱ्या चालक-मालकांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. Maharashtra Education News

राज्यातील बहुतांश शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहेत. मात्र त्याआधीच डिझेल दरवाढीमुळे बस सेवा महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बसच्या दैनंदिन फेऱ्या, वाहनांची देखभाल, विमा प्रीमियम, फिटनेस प्रमाणपत्र, परवाने आणि नियमपालन यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बस चालक-मालकांचे म्हणणे आहे.

पालकांवरील भार कमी करण्यासाठी ‘हायब्रिड’ मॉडेलचा प्रस्ताव.

स्कूलबस ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत बस शुल्क वाढविणे हा सोपा पर्याय आहे. मात्र त्यामुळे पालकांवर थेट आर्थिक ताण पडेल. त्यामुळे शाळांनी आणि प्रशासनाने पर्यायी उपायांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.” Maharashtra Education News

त्यामुळेच आठवड्यातून ३ दिवस प्रत्यक्ष शाळा आणि उर्वरित २ दिवस ऑनलाईन शिक्षण अशी ‘हायब्रिड स्कूलिंग’ पद्धतीचा प्रस्ताव संघटनेकडून पुढे करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे बस फेऱ्यांची संख्या कमी होईल आणि इंधन खर्चात बचत होऊ शकते.

शाळा आणि पालकांची प्रतिक्रिया काय?

या प्रस्तावाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नसला तरी शिक्षण क्षेत्रात यावर चर्चा सुरू झाली आहे. काही पालकांनी वाढत्या बस शुल्कापेक्षा हायब्रिड पद्धत परवडणारी ठरू शकते, असे मत व्यक्त केले आहे. तर काही पालकांनी विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, शिक्षण तज्ज्ञांच्या मते ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष वर्गातील संवाद, शिस्त आणि अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

आगामी काळात बस शुल्क वाढणार?

सध्याच्या परिस्थितीत इंधन दरात आणखी वाढ झाल्यास शाळा बस शुल्कवाढ जवळपास अटळ असल्याचे संकेत संघटनांकडून दिले जात आहेत. त्यामुळे राज्य सरकार, शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापन यांच्याकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!