मुंबई : Government Resolution Maharashtra : राज्य शासनाने दिनांक २ जून २०२६ रोजी विविध विभागांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींशी संबंधित चार महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. यामध्ये अधिसंख्य पदांना मुदतवाढ, १०० टक्के नामनिर्देशनाद्वारे पदभरती, जलजीवन मिशन अंतर्गत वेतनासाठी अनुदान वितरण तसेच सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचा समावेश आहे.
१) जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणातील अधिकाऱ्यांना दिलासा
सामान्य प्रशासन विभागाने अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून नियुक्त झालेल्या, मात्र अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२) अल्पसंख्यांक विभागातील लिपिक पदभरतीला मंजुरी. Government Resolution Maharashtra
अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्यांक आयुक्तालय तसेच जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कक्षांमधील लिपिक-टंकलेखक (गट-क) संवर्गातील पदे १०० टक्के नामनिर्देशनाद्वारे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यातील भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे.
३) जलजीवन मिशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी Government Resolution Maharashtra
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांचा खर्च भागवण्यासाठी आवश्यक अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन वितरण सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
४) सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश. Government Resolution Maharashtra
ऊर्जा, उद्योग, कामगार व खनिकर्म विभागाने सरकारी कामगार अधिकारी (गट-ब) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वर्ष २०२६ मधील नियतकालिक बदल्यांबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना निश्चित करण्यात आल्या आहेत.