Close Visit MahaNews12

अखेर महागाई भत्ता वाढला, इतका झाला DA, जाणुन घ्या माहिती. DA Allowance Update 

mahanews18

मुंबई | प्रतिनिधी

DA Allowance Update : महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता (Dearness Allowance) 58 टक्क्यांवरून वाढवून 60 टक्के करण्यात आला असून, यासंदर्भात राज्य शासनाने दिनांक 05 मे 2026 रोजी शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

केंद्रीय वित्त विभाग, नवी दिल्ली यांनी दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ही कार्यवाही केली आहे. सदर पत्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन अधिकाऱ्यांबाबत माहिती व पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आले होते.

शासन निर्णयानुसार, केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिनांक 01 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे यापूर्वी लागू असलेला 58 टक्के महागाई भत्ता आता 60 टक्के दराने लागू करण्यात आला आहे.

DA Allowance Update

या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत न्यायिक अधिकारी तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देशही शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत. DA Allowance Update

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे न्यायिक अधिकाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

कर्मचारी

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!