Close Visit MahaNews12

राज्यातील या कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया स्थगित; 10 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी,

मुंबई | प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 10 जुलै 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत पुढील आदेश दिले आहेत.

परिपत्रकानुसार, संचालनालयाने यापूर्वी दिनांक 14 मे 2026 रोजी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, माननीय उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल याचिका क्रमांक 4574/2026 मध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी दिलेल्या निर्णयानुसार, संचालनालयाचे पत्र क्रमांक 301 (शिक्षक संवर्ग पदोन्नती), दिनांक 14 मे 2026 हे रद्द करण्यात आले आहे.

या न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत पुढील शासन निर्देश प्राप्त होईपर्यंत कोणतीही पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये.

यामुळे संबंधित पदोन्नती प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली असून, आता शासनाच्या पुढील आदेशानंतरच पदोन्नती संदर्भातील पुढील निर्णय व कार्यवाही केली जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!