Close Visit MahaNews12

पाटोदा आगारात एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी… विनोद डोंगर 

पाटोदा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाटोदा आगारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रवाशांचा सत्कार करण्यात आला तसेच पेढे वाटून वर्धापन दिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने आगारातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सेवाभावाचा गौरव करण्यात आला. एसटीच्या प्रगतीत आणि प्रवासी सेवेच्या उन्नतीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी बदलत आहे’ चा संदेश

कार्यक्रमाला आगार प्रमुख डोके साहेब, AWS शिंदे साहेब, खेडकर साहेब यांच्यासह चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी एसटी महामंडळाच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यात अधिक चांगली आणि आधुनिक प्रवासी सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

वर्धापन दिनानिमित्त पाटोदा आगार आणि बसस्थानक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला असून नागरिक आणि प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते.

यावेळी “एसटी बदलत आहे” हा संदेश देत प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश, अन्यथा वेतन रोखणार. Teacher Salary News 2026

Leave a Comment

error: Content is protected !!