Close Visit MahaNews12

30 जून व 01 जुलै 2026 चे कर्मचाऱ्यांसाठी 5 मोठे शासन निर्णय

Central Government Employees :  30 जून व 01 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षण विभाग आणि वित्त विभागाशी संबंधित एकूण 5 महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी केले आहेत.

1) महिला व बाल विकास विभाग

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी आवश्यक निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

2) सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

3) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील सहायक संचालक, उपसचिव, व्यवसाय शिक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सन 2026 मधील नियतकालिक बदल्यांमध्ये अंशतः सुधारित पदस्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे.

4) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सहाय्यक अधीक्षक, मुख्य लिपिक, कनिष्ठ लेखापरीक्षक, लेखापाल (गट-क) या संवर्गातून अधीक्षक व तत्सम सामान्य राज्य सेवा गट-ब पदावर पदोन्नतीनंतर सुधारित पदस्थापना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

5) वित्त विभाग

नवीन सेवार्थ प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोकण, नाशिक, अमरावती व नागपूर विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

➡️ अशा महत्त्वाच्या शासन निर्णयांची माहिती सर्व सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!