Close Visit Mhshetkari

देशभरात लागू झाले नवे भाडेकरार नियम; भाडेकरूंना मिळाले 7 मोठे अधिकार. New Rent Agreement Rules 2025

New Rent Agreement Rules 2025 : भाड्याने घर घेणाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. केंद्र सरकारने भाडे प्रक्रियेला अधिक सोपी, पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी 2025 चे नवे Rent Agreement Rules लागू केले आहेत. आता मालक आणि भाडेकरू, दोघांसाठीही अनेक कडक आणि स्पष्ट नियम घालून दिले गेले आहेत.

नव्या नियमांनुसार रेंट अ‍ॅग्रीमेंट स्वाक्षरीनंतर 60 दिवसांच्या आत ऑनलाइन नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे हाताने लिहिलेला करार, नोंदणी नसलेली कागदपत्रे किंवा फसवणूक करणारे करार आता चालणार नाहीत.

सरकारने भाडेकरूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी डिपॉझिट, भाडेवाढ, दुरुस्ती, तपासणी, बेदखली, सुरक्षाविषयक प्रक्रिया याबाबत अगदी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. तसंच, सर्व राज्यांना त्यांची डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून भाडेकराराची नोंदणी आता एकदम सोप्या पद्धतीने ऑनलाइन पूर्ण होईल.

See also  महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची तयारी. Maharashtra government employees protest 2025. 

सरकारने भाडेकरूंसाठी 7 नवे विशेष अधिकार जाहीर केले आहेत, जे तुमच्या राहणीमानाला अधिक सुरक्षित आणि कायदेशीर संरक्षण देणार आहेत. ते अधिकार कोणते? पाहूया सविस्तर…

नवीन भाडे करार नियम Rent Agreement Rules 2025

1. डिजिटल स्टॅम्प अनिवार्य

नव्या नियमांनुसार सर्व रेंट अ‍ॅग्रीमेंट आता डिजिटल स्टॅम्पवरच केले जावे लागतील.
स्वाक्षरी झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत त्यांची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

पूर्वी स्टॅम्प पेपरवर करून नोंदणी न केल्यासही करार मान्य होत असे, पण आता तसे नाही.
नोंदणी न केल्यास ₹5,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

2. दोन महिन्यांपेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट नाही

सरकारने जादा डिपॉझिटच्या तक्रारी लक्षात घेऊन हा महत्वाचा नियम केला आहे.

See also  दर महिन्याला हमखास उत्पन्न! पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे संपूर्ण तपशील. Post Office Scheme

निवासी घरांसाठी – जास्तीत जास्त २ महिन्यांचे भाडे इतकाच डिपॉझिट

व्यावसायिक जागांसाठी – जास्तीत जास्त ६ महिन्यांचा डिपॉझिट

यामुळे मोठ्या शहरांमधील अवाजवी डिपॉझिटची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.

3. भाडेवाढ फक्त 12 महिन्यांनंतरच

मालक आता मधेच मनमानी भाडेवाढ करू शकणार नाही.

भाडे किमान 12 महिने पूर्ण झाल्यावरच वाढवता येईल

वाढ करण्यापूर्वी 90 दिवस आधी लेखी नोटीस देणे आवश्यक

New Rent Agreement Rules 2025
यामुळे भाडेकरूला नियोजन करण्यासाठी वेळ मिळेल व अचानक भाडेवाढ टाळली जाईल.

4. मालक जबरदस्तीने घर रिकामे करू शकत नाही

  1. भाडेकरूंना मजबूत कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हा मोठा बदल करण्यात आला आहे.
  2. किराया न्यायाधिकरणाचा आदेश नसल्यास.
  3. मालक भाडेकरूला घर सोडण्यास भाग पाडू शकत नाही.

धमकी देणे, कुलूप लावणे, सामान बाहेर काढणे… हे सर्व आता गुन्हा मानला जाईल.

See also  रेशन कार्ड ekyc अशी करा अन्यथा, रेशन होईल बंद. Ration Ekyc Update

5. परवानगीशिवाय घरात प्रवेश नाही

भाडेकरूंची गोपनीयता जपण्यासाठी नव्या नियमांमध्ये स्पष्ट निर्देश आहेत.

मालकाने घरात प्रवेश करण्यासाठी
किमान 24 तास आधी लेखी सूचना देणे आवश्यक

अचानक घरात येणे किंवा तपासणी करणे पूर्णतः बंद आहे.

6. भाडेकरूंचे पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य

  1. देशभरात आता भाडेकरूंची पोलिस पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे.
  2. यामुळे सर्व नोंदी योग्य राहतील.
  3. कोणताही गैरवापर किंवा संशयास्पद कृती लगेच तपासता येईल.
  4. मालक आणि भाडेकरू दोघेही सुरक्षित राहतील
  5. तसेच, वीज–पाणी बंद करणे किंवा जबरदस्तीचे बेदखलीचे प्रयत्न आता कायदेशीर गुन्हे ठरतील.

7. दुरुस्ती न केल्यास भाड्यातून खर्च वजा करण्याचा अधिकार

  • घरात आवश्यक दुरुस्तीची गरज असल्यास—
  • भाडेकरूने मालकाला कळवावे.
  • 30 दिवसांपर्यंत दुरुस्ती न केल्यास.
  • भाडेकरू स्वतः दुरुस्ती करून घेऊ शकतो.
  • खर्चाचे पुरावे दिल्यास ती रक्कम भाड्यातून वजा करू शकतो

यामुळे भाडेकरूंचे आर्थिक नुकसान होणार नाही.

Leave a Comment