Sat. Apr 11th, 2026

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर मोठा निर्णय – 31 मार्च 2027 पर्यंत स्थगिती. Government Employee Transfer Ban 2027

Government Employee Transfer Ban 2027: केंद्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून दि. 31 मार्च 2027 पर्यंत बदल्या स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

जनगणना 2027 मुळे निर्णय

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, देशात आगामी जनगणना 2027 ची तयारी सुरू आहे. या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमासाठी विविध विभागातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नियुक्त कर्मचाऱ्यांना बदल नाही. Government Employee Transfer Ban 2027

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जनगणनेच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या किंवा नियुक्त्या रद्द करण्यात येऊ नयेत. कारण या प्रक्रियेमुळे जनगणना कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.

प्रशासनात सातत्य ठेवण्यासाठी निर्णय

सरकारचा हा निर्णय प्रशासनात सातत्य राहावे आणि जनगणना प्रक्रियेत कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत अशा कर्मचाऱ्यांची बदली होणार नाही.

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब

हा निर्णय विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, ज्यांची बदली अपेक्षित होती किंवा प्रक्रिया सुरू होती. आता त्यांना किमान 2027 पर्यंत सध्याच्याच ठिकाणी काम करावे लागणार आहे.

जनगणना 2027 हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे काम असल्यामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशासनात स्थिरता राहून जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे. Government Employee Transfer Ban 2027

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *