Thu. Apr 2nd, 2026

आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय जाहीर! Cabinet Decision 2026

Cabinet Meeting News : दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि सरकारी यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 6 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होणार असून अनेक योजनांना गती मिळणार आहे.


🚜 1. उपसा सिंचनासाठी 1234 कोटींची तरतूद

साकळाई, जि. अहिल्यानगर येथे उपसा सिंचन योजनेसाठी 1,234 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे सुमारे 9,600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


🌊 2. नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

राज्यातील प्रदूषित नद्यांच्या पुनर्बांधणीसाठी नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याअंतर्गत राज्यातील 54 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. Cabinet Meeting News


🏟️ 3. अमरावतीत क्रीडा संकुलाला मंजुरी

अमरावती जिल्ह्यातील नवसारी येथे 16,708 चौ.मी. जागा क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यामुळे स्थानिक खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळणार आहेत.


🏛️ 4. अनुसूचित जाती आरक्षणाबाबत समिती

एससी (SC) आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात आलेल्या अर्ज व निवेदनांचा विचार करण्यासाठी
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.


📊 5. भूमी अभिलेख विभागात नवीन पदनिर्मिती. Cabinet Meeting News

भूमी अभिलेख विभागात ‘भुकरमापक’ ऐवजी ‘परिरक्षण भूमापक’ पद निर्माण करण्यात येणार आहे.
हे पद पदोन्नती व विभागीय भरतीसाठी उपलब्ध असणार आहे.


🎓 6. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

इयत्ता 8वी ते 12वी मधील दिव्यांग विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या
शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. Maharashtra Cabinet News

या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय हे शेतकरी, विद्यार्थी, खेळाडू आणि प्रशासन या सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. विशेषतः सिंचन, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रांना मोठा चालना मिळणार आहे. Maharashtra Cabinet News

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *