शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून अध्यादेश जारी. Maharashtra Employee Transfer News

mahanews18

मुंबईMaharashtra Employee Transfer News : सामान्य प्रशासन विभागामार्फत दि. 27 मे 2026 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यां संदर्भात महत्त्वपूर्ण शासन अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. या अध्यादेशाद्वारे “महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005” मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार, महाराष्ट्राच्या राज्यपालांना तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक असल्याची परिस्थिती अस्तित्वात असल्याची खात्री पटल्याने हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय बदली प्रक्रियेला अधिक गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

जनगणना 2027 मुळे बदल्यांच्या वेळापत्रकात बदल. Maharashtra Employee Transfer News

अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे की, आगामी जनगणना 2027 शी संबंधित कामकाज सुरू असल्यामुळे सन 2026 मध्ये होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या निश्चित मुदतीत पूर्ण करण्यात येणार आहेत.

यानुसार, राज्यातील सर्वसाधारण बदल्या दि. 30 जून 2026 रोजी अथवा त्यापूर्वी करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला वेग येणार असून प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. Maharashtra Employee Transfer News

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!