Gold Silver Rates Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि जागतिक राजकीय तणावाचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होताना दिसत आहे. आज जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे.
काल 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 57 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तो आज 1 लाख 56 हजार 500 रुपयांवर आला असून तब्बल 1000 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून काल 2 लाख 70 हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 2 लाख 55 हजार रुपयांवर आली आहे. हे सर्व दर जीएसटी वगळून आहेत.
देशातील प्रमुख शहरांतील आजचे दर
बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 58 हजार 710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा दर 2 लाख 67 हजार 190 रुपये प्रति किलोवर स्थिरावला आहे. पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही जवळपास हेच दर पाहायला मिळत आहेत. Gold Silver Rates Today
दिल्लीमध्ये सोन्याचा दर 1 लाख 58 हजार 540 रुपये असून चांदी 2 लाख 67 हजार 610 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. दरम्यान, जळगावमध्ये इतर शहरांच्या तुलनेत किंचित कमी दर नोंदवले गेले आहेत.
दरातील अस्थिरतेमागे कोणती कारणे? Gold Silver Rates Today
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण संघर्ष, आयातीवरील निर्बंध आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता वाढली आहे. भारत सरकारने चांदी आणि सोन्याच्या आयातीवर काही निर्बंध लागू केल्याने त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
गुंतवणूकदारांसाठी काय आहे सल्ला?
आर्थिक विश्लेषकांच्या मते, दीर्घकालीन कालावधीत सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र अल्पकालीन कालावधीत चढ-उतार कायम राहू शकतात. त्यामुळे एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दर घसरल्यावर टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकते. Gold Silver Rates Today