Close Visit MahaNews12

महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देणार! राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. Maharashtra DA Arrears 2026

mahanews18

महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देणार! राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. Maharashtra DA Arrears 2026

Maharashtra DA Arrears 2026  : राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DA) 55% वरून 58% इतकी वाढ मंजूर करण्यात आली होती. आता या वाढीची उर्वरित थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

काय आहे शासन निर्णय?

दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, दिनांक 1 जुलै 2025 पासून महागाई भत्ता 55% वरून 58% करण्यात आला होता. यानंतर जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 मध्ये देण्यात आली होती.

आता शासनाने नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या उर्वरित कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणाला मिळणार लाभ? Maharashtra DA Arrears 2026

या निर्णयाचा लाभ खालील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे: 

  • राज्य शासकीय कर्मचारी
  • 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणारे कर्मचारी
  • इतर पात्र कर्मचारी
  • अनुदानित संस्था कर्मचारी
  • जिल्हा परिषद कर्मचारी

थकबाकी कधी मिळणार?

शासन निर्णयानुसार:

  • नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील DA थकबाकी
  • मे 2026 च्या पगारासोबत
  • रोखीने खात्यात जमा केली जाणार आहे.

खर्च कुठून होणार?

महागाई भत्त्यावरील खर्च संबंधित विभागांच्या वेतन व भत्ते लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे. अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही संबंधित उपलेखाशिर्षाखाली हा खर्च दाखवण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांना दिलासा. Maharashtra DA Arrears 2026

महागाई आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः प्रलंबित DA थकबाकी रोखीने मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!