Close Visit MahaNews12

पीएफ खात्यात 2025-26 चे व्याज जमा; खातेदारांना ईपीएफओचा मेसेज, असा तपासा तुमचा PF बॅलन्स

मुंबई : EPFO Interest Credited 2025-26 :   कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफ खातेदारांच्या खात्यात 8.25 टक्के दराने व्याज जमा करण्यास सुरुवा केली आहे. अनेक खातेदारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व्याज जमा झाल्याचे एसएमएसही पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता आपल्या खात्यात किती व्याज जमा झाले आहे हे सहज तपासता येणार आहे.

8.25 टक्के दराने व्याज जमा

ईपीएफओने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के दराने व्याज खात्यांमध्ये वर्ग केले आहे. 31 मार्च 2026 पर्यंत पीएफ खात्यात असलेल्या शिल्लक रकमेवर हे व्याज जमा करण्यात आले आहे. यंदा नव्या केंद्रीकृत आयटी प्रणालीमुळे व्याज जमा करण्याची प्रक्रिया गतवर्षीच्या तुलनेत अधिक वेगाने पूर्ण होत आहे.

34 कोटी खात्यांमध्ये 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज

ईपीएफओकडून देशभरातील सुमारे 34 कोटी पीएफ खात्यांमध्ये तब्बल 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज जमा करण्यात येत आहे. नव्या Centralised IT Enabled System मुळे व्याज वर्ग करण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे.

पीएफ खात्यात व्याज जमा झाले की नाही, असे तपासा

तुमच्या खात्यात व्याज जमा झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी ईपीएफओच्या पासबुक पोर्टलवर लॉगिन करा.

  • UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • View Passbook या पर्यायावर क्लिक करा.
  • संबंधित Establishment ID निवडा.
  • आर्थिक वर्ष 2025-26 निवडल्यानंतर जमा झालेले व्याज आणि संपूर्ण व्यवहार पाहता येतील.

UMANG App वरूनही बॅलन्स तपासता येणार

ईपीएफओ सदस्यांना UMANG App द्वारेही पीएफ खात्याची शिल्लक, पासबुक आणि इतर सेवा उपलब्ध आहेत. मोबाईलवरून काही मिनिटांतच पीएफ बॅलन्स तपासता येतो.

क्लेम ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढली

ईपीएफओने अलीकडेच ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच, नियमानुसार पात्र सदस्यांना पीएफ खात्यातील उपलब्ध शिल्लक रकमेपैकी 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

पोर्टल अपग्रेडनंतर व्याज जमा

काही दिवसांपूर्वी UAN Member Interface आणि Passbook Portal अपग्रेडेशनसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. अपग्रेडेशन पूर्ण झाल्यानंतर ईपीएफओने व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अनेक खातेदारांना त्याचे एसएमएस मिळण्यास सुरुवात झाली आहे.

पीएफ खातेदारांनी आपल्या खात्यात व्याज जमा झाले आहे की नाही, हे पासबुक पोर्टल किंवा UMANG App द्वारे तपासून खात्याची अद्ययावत माहिती पाहावी.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!