Close Visit MahaNews12

आठवा वेतन आयोग लागू होण्यास विलंबाची शक्यता; कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान वाढणार? Central Government Employees

आठवा वेतन आयोग लागू होण्यास विलंबाची शक्यता; कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान वाढणार? Central Government Employees

मे-जून 2027 पर्यंत आयोगाला मुदत, प्रत्यक्ष अंमलबजावणी 2027 च्या अखेरीस होण्याची शक्यता

नवी दिल्ली :  Central Government Employees : केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता असताना, आयोग लागू होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेतनवाढ आणि सुधारित पेन्शनच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाचे कामकाज मे किंवा जून 2027 पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आयोगाने सादर केलेल्या शिफारशींची पडताळणी, विविध मंत्रालयांशी चर्चा आणि केंद्र सरकारची मंजुरी या प्रक्रियेसाठी आणखी काही महिने लागणार आहेत.

थकबाकी मिळणार; पण विलंबामुळे वाढणार प्रतीक्षा. Central Government Employees

आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा प्रस्ताव असल्याने कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनासह महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पेन्शनधारकांनाही सुधारित पेन्शनचा लाभ आणि थकबाकी दिली जाणार आहे.

मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी उशिरा झाल्यास कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना वाढीव वेतन व पेन्शनसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे आर्थिक लाभ मिळणार असला तरी त्यात होणारा विलंब हा कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. Central Government Employees

दरम्यान, आयोगाच्या शिफारशी, फिटमेंट फॅक्टर आणि वेतनवाढीचे अंतिम स्वरूप काय असेल, याकडे देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!