अखेर महागाई भत्ता वाढला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, इतकी वाढ लागु. DA Allowance Update
मुंबई, 11 ऑगस्ट 2025..
DA Allowance Update : महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी व इतर पात्र पूर्णवेळ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या ताज्या आदेशानुसार, 9 जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता (DA) दरात वाढ करण्यात आली असून तो 53% वरून 55% करण्यात आला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीसाठी लागू राहील.
वित्त विभागाच्या आदेशानुसार, 9 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जाहीर केलेल्या वाढीचा लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. DA Allowance Update
शासनाने स्पष्ट केले आहे की, महागाई भत्त्याची रक्कम ही ऑगस्ट देय सप्टेंबर च्या वेतनामध्ये, नियमित पगारासोबतच अदा केली जाईल. तसेच, निवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही ही वाढ लागू होणार आहे.