Close Visit Mhshetkari

Sat. May 16th, 2026

PF Auto Settlement  :देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि EPFO सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच (EPFO) आता सेवानिवृत्तीनंतर अंतिम पीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित (Auto Settlement) करण्याच्या तयारीत आहे. यामुळे निवृत्तीनंतर पीएफची रक्कम अवघ्या 3 दिवसांत थेट बँक खात्यात जमा होऊ शकते..

अंतिम PF दावे आता होणार Auto Settlement द्वारे

सध्या EPFO कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या आंशिक किंवा आगाऊ PF काढण्याच्या दाव्यांचे स्वयंचलित पद्धतीने निवारण केले जाते. या प्रक्रियेत दावा दाखल केल्यानंतर साधारणपणे 3 दिवसांत पैसे खात्यात जमा होतात.

आता हीच सुविधा अंतिम PF काढण्याच्या दाव्यांसाठीही लागू करण्याच्या दिशेने EPFO ने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रक्रियेत अडकून राहावे लागणार नाही.

नोकरी बदलल्यास PF खाते आपोआप ट्रान्सफर होणार. PF Auto Settlement

EPFO चे आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी नोकरी बदलल्यास PF खाते हस्तांतरणाची प्रक्रिया देखील स्वयंचलित करण्यात येणार आहे.

यामुळे सदस्यांना वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. जुन्या PF खात्याला नवीन सदस्य खात्याशी आपोआप जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे PF ट्रान्सफर प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे.

7 कोटींहून अधिक सदस्यांना मिळणार फायदा. EPF Withdrawal Process,

EPFO चे देशभरात 7 कोटींपेक्षा अधिक सदस्य आहेत. स्वयंचलित दावा निवारण प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार असून, तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास मदत होणार आहे.

गेल्या आर्थिक वर्षात Auto Claim Settlement प्रणालीद्वारे तब्बल 1.87 कोटी दावे निकाली काढण्यात आले असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

नवीन कामगार संहितांनुसार होणार बदल. PF Auto Settlement

EPFO कडून चारही नवीन कामगार संहितांअंतर्गत नियमांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारने 8 मे रोजी या नवीन कामगार संहितांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या अंतर्गत पुढील तीन महत्त्वाच्या योजनांनाही पुन्हा अधिसूचना जारी केली जाणार आहे : EPF Withdrawal Process,

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952
  • कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना 1976
  • कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995

EPFO च्या नवीन सुधारणांमुळे काय फायदा होणार?

EPFO च्या नव्या डिजिटल आणि स्वयंचलित सुधारणांमुळे :

  • PF दावा प्रक्रिया जलद होणार
  • 3 दिवसांत पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता
  • PF ट्रान्सफर प्रक्रिया सोपी होणार
  • KYC संबंधित अडचणी कमी होणार
  • सदस्यांच्या तक्रारी कमी होणार

कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसाठी मोठा दिलासा. PF Auto Settlement

EPFO कडून करण्यात येत असलेल्या या मोठ्या सुधारणांमुळे कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः निवृत्तीनंतर PF रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब कमी होणार असून, डिजिटल प्रक्रियेमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed