मुंबई | प्रतिनिधी, दि 16 फेब्रुवारी 2026
Employee Retirement Benefits Delay : नमस्कार मित्रानो राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पीएफ, ग्रॅच्युइटी आणि रजा रोखीकरणाच्या रकमांच्या देयकांमध्ये मोठा विलंब होत असल्याचे समोर आले आहे. निधीअभावी ही देणी वेळेवर न मिळाल्याने अनेक निवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
नियमांनुसार कर्मचारी ज्या महिन्यात निवृत्त होतो, त्या महिन्याच्या अखेरीस त्याची पीएफची संपूर्ण रक्कम देणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात दोन ते तीन महिने उलटूनही रक्कम मिळत नसल्याची तक्रार आहे. काही प्रकरणांत सहा ते आठ महिन्यांपासून देयके प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.
आठ महिन्यांपासून प्रतीक्षा. Employee Retirement Benefits Delay
महामंडळातील अनेक विभागांमध्ये पदे रिक्त असल्याने चालक व वाहकांसह कर्मचाऱ्यांवर दुहेरी कामाचा ताण आहे. रजा न घेता केलेल्या अतिरिक्त सेवेच्या मोबदल्यात मिळणाऱ्या रजा रोखीकरणाच्या रकमादेखील थकीत आहेत. जून २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६ पर्यंतही संपूर्ण देयके मिळालेली नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
संघटनांची तातडीची मागणी. Employee Retirement Benefits Delay
एसटी कर्मचाऱ्यांना आधीच कमी वेतनावर सेवा द्यावी लागते. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम वेळेत मिळणे अत्यावश्यक असताना तीच रखडल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने निधी उपलब्ध करून देत नियमांनुसार हक्काची देणी त्वरित अदा करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाकडून निधीअभावी देयके टप्प्याटप्प्याने देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रलंबित देणी लवकरात लवकर अदा करण्याबाबत स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी निवृत्त कर्मचाऱ्यांकडून होत आहे.





