Close Visit MahaNews12

खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी महत्त्वाची सूचना! मुख्याध्यापकांनी 8 ऑगस्टपूर्वी शिक्षकांची माहिती अपडेट करणे बंधनकारक

मुंबई : School Education Department :  राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती ऑनलाइन भरण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, सर्व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी (HM Login) बदली पोर्टलवर शिक्षकांची माहिती 8 ऑगस्ट 2026 पर्यंत अनिवार्यपणे भरून किंवा अद्ययावत करून पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या दि. 23 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संचालनालयाच्या 13 जुलै 2026 च्या पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), पुणे यांनी मुख्याध्यापक लॉगिनमध्ये स्वतंत्र Tab उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेद्वारे शैक्षणिक वर्ष 2026-27 पर्यंतच्या वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती संचमान्यता प्रणालीमध्ये भरता येणार आहे.

8 ऑगस्टपर्यंतच सुविधा उपलब्ध

विभागाने स्पष्ट केले आहे की, ही ऑनलाइन सुविधा दि. 08 ऑगस्ट 2026 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. याबाबत पोर्टलवर Running Strip द्वारेही मुख्याध्यापकांना सूचना दर्शविण्यात येणार आहे.

सर्व मुख्याध्यापकांना तातडीने सूचना. School Education Department

संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना तात्काळ सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीपूर्वी सर्व शिक्षकांची माहिती भरून किंवा अद्ययावत करून प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.

मुदत चुकल्यास जबाबदारी मुख्याध्यापकांची

शिक्षण विभागाने इशारा दिला आहे की, 8 ऑगस्ट 2026 नंतर पोर्टलवरील सुविधा बंद झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित कार्यालयाची राहील. त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी मुदतीपूर्वी माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. School Education Department

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!