तरुणांना मिळणार 15000 रुपये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जाहीर, यांना होणार फायदा . PM Viksit Bharat Rozgar Yojana

तरुणांना मिळणार 15000 रुपये प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जाहीर, यांना होणार फायदा . PM Viksit Bharat Rozgar Yojana.

नवी दिल्ली – PM Viksit Bharat Rozgar Yojana : स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ ऑगस्ट २०२५) प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) ची घोषणा केली. या योजनेसाठी सरकारने तब्बल ₹१ लाख कोटींचा निधी राखून ठेवला आहे. देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे आणि कंपन्यांना नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

सरकारच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत पुढील दोन वर्षांत सुमारे ३.५ कोटींना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये १.९२ कोटी तरुणांना ही पहिली नोकरी असेल.

पहिल्या नोकरीवर थेट ₹१५,००० मिळणार PM Viksit Bharat Rozgar Yojana

पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या पात्र उमेदवारांना सरकारकडून ₹१५,००० आर्थिक मदत दिली जाईल. ही रक्कम दोन हप्त्यांत — सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आणि आर्थिक साक्षरता प्रशिक्षणानंतर — थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. पेमेंट डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (DBT) मार्फत करण्यात येईल.

See also  जर तुमचा पीएफ कापला जात असेल, तर आनंदाची बातमी, तुमच्या खात्यात ₹५२,००० जमा होणार, येथे अपडेट पहा. Epfo new update today

कंपन्यांना प्रोत्साहन. PM Viksit Bharat Rozgar Yojana

नवीन उमेदवारांना पहिल्यांदाच नोकरीवर घेणाऱ्या नियोक्त्यांना सरकार प्रति कर्मचारी ₹३,००० पर्यंत प्रोत्साहन देणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांसाठी हा लाभ तिसऱ्या आणि चौथ्या वर्षापर्यंतही मिळू शकतो.

योजनेचा कालावधी.

ही योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. नियोक्त्यांनी कर्मचाऱ्यांची माहिती EPFO च्या इलेक्ट्रॉनिक चालान-कम-रिटर्न (ECR) मध्ये अचूक नोंदवणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास नियोक्ता आणि कर्मचारी — दोघांनाही लाभ मिळणार नाही.

योजनेचा आढावा.

घटक तपशील

योजना नाव प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY)
निधी ₹१ लाख कोटी
रोजगार निर्मिती ३.५ कोटींपर्यंत रोजगार संधी
युवा लाभ पहिल्या नोकरीवर ₹१५,००० (२ हप्त्यांत)
कंपन्यांना लाभ प्रति कर्मचारी ₹३,००० प्रोत्साहन
कालावधी १ ऑगस्ट २०२५ – ३१ जुलै २०२७
अट EPFO नोंदणी, योग्य ECR, DBT द्वारे पेमेंट

See also  राज्य कर्मचारी सेवा नियमावलीत महत्त्वाचे बदल, सरकारने घेतला मोठा निर्णय. Maharashtra State Employee Rules

पंतप्रधान मोदी यांनी भाषणात म्हटले की, ही योजना केवळ रोजगारच निर्माण करणार नाही तर देशातील औपचारिक रोजगार क्षेत्र मजबूत करण्यास आणि युवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास मदत करेल.

PM Viksit Bharat Rozgar Yojana

Har Ghar Tiranga प्रमाणपत्र डाउनलोड करा आणि ठेवा आपल्या स्टेटस ला ! असे करा डाउनलोड.

Leave a Comment