Close Visit Mhshetkari

आरबीआयची मोठी कारवाई! आयसीआयसीआय बँकेसह चार सहकारी बँकांना लाखोंचा दंड. RBI new Update

आरबीआयची मोठी कारवाई! आयसीआयसीआय बँकेसह चार सहकारी बँकांना लाखोंचा दंड. RBI new Update

मुंबई |..

RBI New Update : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी कारवाई करत आयसीआयसीआय बँकेसह देशातील चार सहकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला आहे. नियमन आणि बँकिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेवर ₹75 लाखांचा दंड
आरबीआयच्या मते, आयसीआयसीआय बँकेने मालमत्ता मूल्यांकन व चालू खाते उघडण्यासंबंधी असलेल्या नियमांचे पालन केले नाही. तारण कर्जासाठी ठेवलेल्या मालमत्तांचे स्वतंत्र मूल्यांकन झाले नाही तसेच चालू खाती उघडताना नियमभंग झाला. 31 मार्च 2025 रोजीच्या तपासणीत या त्रुटी आढळून आल्या. यानंतर बँकेला नोटीस देऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली, मात्र समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने ₹75 लाखांचा दंड आकारण्यात आला.

चार सहकारी बँकांनाही दंड. RBI New Update 

  1. अंदमान अँड निकोबार स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड – केवायसी नियमांचे उल्लंघन; दंड ₹16 लाख.
  2. कटिहार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (बिहार) – संचालकांना कर्ज देताना नियमभंग; दंड ₹3.03 लाख.
  3. छनसमा नागरिक सहकारी बँक लिमिटेड (गुजरात) – 24×7 इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा पुरवण्यात त्रुटी; दंड ₹2.40 लाख.
  4. रैगंज मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (पश्चिम बंगाल) – केवायसी पालन न केल्याने; दंड ₹3.10 लाख.

आरबीआयचा इशारा.RBI New Update 

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि बँकिंग प्रणालीतील शिस्त कायम ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील. सर्व बँकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कडक कारवाई टाळता येणार नाही.

Leave a Comment